Pandharpur Temple Reopen : पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराला अडीच टन फुलांची अनोखी सजावट
Continues below advertisement
आज शारदीय नवरात्राला सुरुवात होत असताना गेल्या सहा महिन्यापासून बंद असलेली राज्यातील मंदिरे खुली होत असून घटस्थापनेच्या या शुभमुहूर्तावर विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे . पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभुळकर यांनी ही फुलांची सेवा दिली असून आजच्या सजावटीसाठी विविध प्रकारच्या जवळपास अडीच टन फुलांचा आणि तुळशीपत्राचा वापर केला आहे . यामध्ये लक्षावधी तुळशीच्या पानांसह झेंडू , गुलाब, अष्टर , शेवंती , जरबेरा , कागडा , कामिनी , ग्लॅडीओ या फुलांचा वापर करण्यात आला आहे . विठुरायाचा गाभारा त्याच्या लाडक्या तुळशीपत्राने भरून गेला असून रुक्मिणी मातेच्या मागे शेवंतीच्या फुलाचे पडदे करण्यात आले आहेत .
Continues below advertisement