Dhule Suicide Case : धुळ्यात एका कुटुंबातील चौघांची आत्महत्या, कारण स्पष्ट नाही
नाशिक शहराच्या पाठोपाठ धुळे शहरात देखील एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे. धुळे शहरातील प्रमोद नगर भागात राहणाऱ्या गिरासे कुटुंबातील आई-वडिलांसह दोन मुलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आत्महत्या मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कुटुंबाचे प्रमुख असणारे प्रवीण गिरासे यांचे फर्टीलायझरचे दुकान असून पत्नी आणि दोन मुलांसमवेत ते प्रमोद नगर येथे वास्तव्यास होते, मंगळवारी आपण मुलाच्या ऍडमिशन साठी मुंबईला जात असल्याचे त्यांनी परिसरातील नागरिकांना सांगितले होते, मात्र मंगळवारपासून घराचा दरवाजा बंद असल्याचे नागरिकांना दिसले नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. प्रवीण गिरासे यांची बहीण या आज सकाळच्या सुमारास त्यांना भेटण्यासाठी घरी आल्यानंतर घराचा दरवाजा तात्पुरता लावण्यात आला होता तो त्यांनी उघडला असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळीभाव घेतली असून परिसरातील नागरिकांनी देखील गर्दी केली आहे....