Mahapalikecha Mahasangram Dhule 'आमची पिळवणूक थांबवा', धुळेकरांनी वाचला समस्यांचा पाढा; कोणाची बाजी?
Continues below advertisement
धुळे (Dhule) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे, तर दुसरीकडे नागरिक मूलभूत समस्या आणि भ्रष्टाचाराच्या (Corruption) मुद्द्यांवरून आक्रमक झाले आहेत. ‘फक्त 'भाऊबली' आहे आणि तो दोन नंबरवाला पैसा खर्च करू शकतो म्हणून हा योग्य उमेदवार आहे याचा कुठेही विचार करू नका,’ अशी स्पष्ट भूमिका वकील प्रवीणकुमार परदेशी यांनी मांडली आहे. आगामी निवडणुकीत सुशिक्षित आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या उमेदवारांनाच संधी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. व्यापाऱ्यांनी नळ कनेक्शन नसतानाही ५०० रुपये पाणीपट्टी आकारली जात असल्याचा आणि शहरातील रस्त्यांच्या कामात तब्बल तीन हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. शहराच्या विकासासाठी आणि तरुणांच्या रोजगारासाठी उद्योगधंदे आकर्षित करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement