उत्तर प्रदेशातील धर्मांतर प्रकरणाचं यवतमाळ कनेक्शन समोर, धीरज जगतापला उत्तर प्रदेश ATS कडून अटक
Continues below advertisement
मुंबई : उत्तर प्रदेशमध्ये सध्या धर्मांतराचा विषय चर्चेत असतानाच आता उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने या प्रकरणात आणखीन एक अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव धीरज जगताप असून तो महाराष्ट्राच्या यवतमाळमधील राहणार आहे. धीरज जगतापला दहशतवादी विरोधी पथकाने उत्तर प्रदेशच्या कानपूर मधून अटक केली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये 20 जून रोजी अवैधरित्या धर्मांतर करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. याचा तपास उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाकडून सुरु झाला. या प्रकरणात देशभरातून 14 लोकांना अटक करण्यात आली.
मौलाना उमर गौतम, मौलाना कलीम सिद्दिकी सोबत महाराष्ट्र नेटवर्कच्या रामेश्वर कावडे उर्फ आदम उर्फ एडम भुप्रिया बंदो उर्फ अरसलान मुस्तफा आणि कौशर आलम या प्रमुख आरोपींना उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली.
Continues below advertisement