Dharmaveer 2 : धर्मवीर सिनेमातून हिंदूत्वावर भाष्य; डायलॉगने वेधलं लक्ष

Continues below advertisement

Dharmaveer 2 : धर्मवीर सिनेमातून हिंदूत्वावर भाष्य; डायलॉगने वेधलं  लक्ष बहुप्रतिक्षित 'धर्मवीर-2' (Dharmaveer 2) सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. या सोहळ्याला सिनेमातील कलाकारांसह अशोक सराफ, महेश कोठारे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची देखील उपस्थिती होती. धर्मवीर-2 या सिनेमाविषयी अनेकांना उत्सुकता आहे. कारण या सिनेमातून महाराष्ट्राच्या राजकारणातील कोणत्या घटनेचा उलगडा केला जाणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण याचं उत्तर येत्या 9 ऑगस्ट रोजी सिनेमागृहांत प्रेक्षकांना मिळणार आहे. मात्र त्याआधीच सिनेमातील काही संवादांनी विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.   दरम्यान या सिनेमातील काही संवादांमधून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला असल्याचंही म्हटलं जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या घरातला मुख्यमंत्री अशा शब्दांत वारंवार टीकास्त्र डागण्यात आलं आहे. त्याच मुद्द्यावरुन सिनेमातला एक संवाद असल्याचं म्हटलं आहे. या संवादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्पष्टीकरण देत भाष्य केलं आहे.   सिनेमातील संवाद काय? प्रसाद ओक आनंद दिघेंची भूमिका साकारत आहे. यामध्ये एक डायलॉग आहे की,नेता स्वत:च्या घरात नाही  लोकांच्या दारातच शोभून दिसतो. त्यावरुन पुन्हा एकदा रोख उद्धव ठाकरेंवर तर नाही ना असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान आता यावर उद्धव ठाकरे किंवा ठाकरे गटाकडून कोणाची प्रतिक्रिया येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram