MNS | मनसेची मराठीकडून हिंदुत्वाकडे जोरदार वाटचाल सुरु? | ABP Majha
मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनाचं नवं पोस्टर समोर आलंय. त्यार राज ठाकरेंचा फोटो आणि महाराष्ट्राचा भगवा रंगलातील फोटो दाखवण्यात आलाय. या पोस्टरवर विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा असं लिहीण्यात आलंय. त्यामुळं मनसेची वाटचाल आता मराठीकडून हिंदुत्वाकडे होत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळं मनसे भाजपसोबत जाऊ शकते या चर्चेला पुन्हा जोर आलाय.