Dharavi : 'विरोधकांनी त्यांच्या काळात Mumbai मध्ये केलेला एकतरी प्रकल्प दाखवावा', फडणवीसांचे आव्हान

धारावी पुनर्विकास (Dharavi Redevelopment) प्रकल्पावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या त्रिमूर्ती सरकारची कामगिरी अधोरेखित केली. 'विरोधकांनी त्यांच्या काळात मुंबईमध्ये (Mumbai) केलेला एक प्रकल्प दाखवावा,' असे थेट आव्हान फडणवीस यांनी दिले आहे. सात वर्षांच्या आत धारावीतील दहा लाख नागरिकांना त्यांच्या हक्काची घरे देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, दोन लाख लोकांसाठी रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बिल्डरांना भागीदार मानून, पण सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून हे सरकार काम करत असल्याचे फडणवीस म्हणाले. भाषणांनी पोट भरत नाही, तर विकासामुळे लोकांच्या जीवनात परिवर्तन घडते, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. कोर्ट-कचेऱ्यांमधून मार्ग काढून संपूर्ण मुंबईचा विकास लवकरच सुरू करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola