Dharashiv Farmers' Protest | पवनचक्की विरोधात उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांची प्रकृती खालावली
धाराशिव जिल्ह्यात पवनचक्कीच्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस. उपोषणाला बसलेल्या सहा शेतकऱ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना वाशी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पवनचक्की कंपन्यांनी फसवणूक केल्याचा आणि ठेकेदारांकडून लूट होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. पवनचक्कीसाठी गेलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी.