Dhangar Protest : जालना येथील 8 दिवसांपासून सुरू असलेलं धनगर आंदोलकांचं आमरण उपोषण मागे

Continues below advertisement

जालना जिल्ह्यात जामखेड इथे ८ दिवसांपासून सुरू असलेलं धनगर आंदोलकांचं आमरण उपोषण मागे घेण्यात आलंय. पालकमंत्री अतुल सावे आणि संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत आंदोलकांनी ज्यूस देऊन उपोषण मागे घेण्यात आलं. एक समिती नेमून तीन महिन्याच्या आत या बाबत निर्णय घेण्याच आश्वासन दिल्यानंतर आरक्षण मागे घेण्यात आलं. धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसंदर्भात नेमलेल्या समितीत नऊ सदस्य आहेत. ते इतर राज्यातील धनगर समाजाला मिळालेल्या आरक्षणाच्याबाबतीत अभ्यास करून तीन महिन्याच्या आत हा अहवाल सरकारला सुपूर्द करणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram