
Dhananjay Munde Son : आई करुणा शर्मानं वडिलांसह आमचाही छळ केला, मुंडेंचा लेक काय म्हणाले?
Dhananjay Munde Son : आई करुणा शर्मानं वडिलांसह आमचाही छळ केला, मुंडेंचा लेक काय म्हणाले?
SeeShiv Munde Instagram Story : मंत्री धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात न्यायालयाकडून दोषी ठरवण्यात आलंय.
धनंजय मुंडे यांच्या पत्नी करूणा शर्मा यांनी केलेले आरोप कोर्टानं मान्य केले आहेत. करूणा मुंडेंना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. वांद्रे फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना दोषी ठरवले असून करुणा शर्मा यांना 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कोर्टाने आदेश दिल्यानंतर सुरु झालेल्या चर्चेवर करुणा शर्मा यांचा मुलगा सिशिव मुंडे याने प्रतिक्रिया दिली आहे. एकिकडे न्यायालयाने करुणा शर्माच्या बाजूने निर्णय दिलेला असताना सिशिव मुंडे याने वडिलांची बाजू घेतलीये.
मी सिशिव धनंजय मुंडे, मला आता बोलणे भाग आहे कारण माध्यमांनी आमच्या कुटुंबाला मनोरंजनाचा विषय बनवून टाकले आहे. माझे वडिल जगातले सर्वोत्कृष्ट वडिल नसले तरी ते आम्हा भावंडांना कधीही धोकादायक नव्हते. माझी आई कायम तिच्या अनेक विविध कारणांमुळे बाधित असायची आणि त्याचा वचपा ती आम्हाला वेदना देऊन काढायची. माझ्या आईला अनेक traumas आहेत. त्याचा वचपा ती आम्हाला वेदना देऊन काढायची. तिने घरगुती हिंसाचार झाल्याचे आरोप केले आहेत. मात्र खरं तर तिच्याकडून माझ्यासोबत व वडिलांवर घरगुती हिंसाचार व्हायचा.