Dhananjay Munde: सर्वसाधारण सभेकडे धनंजय मुंडेंची पाठ, अनुपस्थित पंकजा मुंडेंनी सभा संपवली
Continues below advertisement
राजकारणातली भाऊबंदकी नवी नाही. राजकारणापायी भल्याभल्या नेत्यांची घरं दुभंगल्याची उदाहरणं देशभरात आहेत. अशाच राजकीय वैरापायी एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या मुंडे भावंडांमध्येही आता भाऊ-बहिणीचं नातं राहिलेलं नाही. तशी कबुलीच माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दिली. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत धनंजय मुंडे यांनी त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांच्याबरोबरच्या दुरावलेल्या नातेसंबंधांवर भाष्य केलं. नातेसंबंध आधी होते, पण राजकारणातून वैर निर्माण झालं, असं सांगत, पंकजा मुंडे यांना वादग्रस्त वक्तव्याबाबत आत्मपरीक्षण करण्याचा सल्लाही धनंजय मुंडे यांनी दिला.
Continues below advertisement