Dhananjay Munde Parli Vidhan Sabha : उमेदवारी अर्ज भरण्यााधी धनंजय मुंडे यांचं औक्षण

Continues below advertisement

Dhananjay Munde Parli Vidhan Sabha : उमेदवारी अर्ज भरण्यााधी धनंजय मुंडे यांचं औक्षण
परळी विधानसभेसाठी धनंजय मुंडे भरणार उमेदवारी अर्ज   नाथरा गावातून मुंडेंच्या दौऱ्याला सुरुवात बहिण पंकजा मुंडे यांची विशेष उपस्थिती  बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघासाठी धनंजय मुंडे आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. नाथरा या मूळ गावातून धनंजय मुंडे यांनी दौऱ्याला सुरुवात केलीय. नाथरा गावातील निवस्थानी आई रुक्मिणी मुंडे यांचे दर्शन घेवून, स्वर्गीय पंडित राव मुंडे यांच्या स्मृतिस्तंभावर नतमस्तक झाले आहेत. धनंजय मुंडे यांच्यासोबत बहिण पंकजा मुंडे या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विशेष उपस्थित आहेत. नाथरा गावात देवदर्शन झाल्यानंतर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिस्थळाचं धनंजय मुंडे दर्शन करतील, त्यानंतर साधारण अकरा वाजता धनंजय मुंडे परळी तहसील कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी कोणतेही शक्ती प्रदर्शन होणार नाही असं धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. मात्र कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंडेंसोबत आहेत.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram