Dhananjay Munde - Pankja Munde Arti : अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडेंकडून धनंजय मुंडेंचं औक्षण

Continues below advertisement

Dhananjay Munde - Pankja Munde Arti : अर्ज भरण्यापूर्वी पंकजा मुंडेंकडून धनंजय मुंडेंचं औक्षण

पंकजा मुंडे प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे यांनी भरला उमेदवारी अर्ज

बीडच्या परळी तहसील कार्यालयामध्ये भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत धनंजय मुंडे यांनी विधानसभेकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पाच लाडक्या बहिणी सोबत धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे.

परळी विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचा उमेदवार नसणार आहे. यावर प्रकाश महाजन यांनी आजचा दिवस दुर्दैवी असल्याचं विधान केले होते. यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देत ज्या कमळाने येथे सुरुवात झाली असं वाटणं वेगळी गोष्ट आहे. ते मुंबईतून म्हणाले आहेत. त्यावर मी टिपण्णी करणार नाही म्हणत यावर बोलणं टाळले आहे.

बीड जिल्ह्यात जागा वाटपावरून कोणताही तिढा नाही चर्चा आहे. चर्चा ज्यावेळी होतील तेव्हा फायनल होईल ते कळलच आम्ही विचारपूर्वक उमेदवार घेत असून विजयाची गणित साधून हे करत असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram