Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे कोणत्या बॉम्बबद्दल बोलतायत? कुणाला पाहून ठोकला शड्डू?
भागृहात फुटणारे आरोप प्रत्यारोपांचे बॉम्ब नेत्यांना आणि जनतेला काही नवीन नाहीत. पण आज राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचा सभागृहातील एक व्हिडीओ व्हायरल झालाय. आणि त्याची सगळीकडेच चर्चा आहे. या व्हिडीओत धनंजय मुंडे खाणाखुणा करून कुणालातरी बॉम्ब बद्दल विचारणा करताना दिसताय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील सभागृहात मुद्दा मांडत असताना त्यांच्या मागे बसलेल्या धनंजय मुंडेंच्या या खाणाखुणा आज चर्चेचा विषय आहेत. विरोधी बाकाकडे पाहून आज कोणता बॉम्ब अशी विचारणा ते करतायत... बर एवढ्यावरच ते थांबले नाहीत. तर त्यांनी येऊदे बॉम्ब आम्ही तयार आहोत.. असा आवेश दाखवत शड्डूही ठोकलाय.
Tags :
Abp Majha ABP Maza Dhananjay Munde Budget Session ABP Majha Maharashtra Budget Session Abp Maza Live