Dhananjay Munde : धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर, प्रल्हाद जोशींच्या निवासस्थानी दाखल

Dhananjay Munde : धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर, प्रल्हाद जोशींच्या निवासस्थानी दाखल

Dhananjay Munde Walmik Karad: मकोका लागलेल्या वाल्मिक कराड (Walmik Karad) प्रकरणावरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्यासाठी दबाब वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवरच धनंजय मुंडे दिल्लीत आहेत. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांची भेट घेण्यासाठी धनंजय मुंडे दिल्ली दौरा करत आहे. आज (29 जानेवारी) धनंजय मुंडे आणि केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री यांच्यात दुपारी 12 वाजताच्या दरम्यान भेट होणार आहे.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) आजपासून (29 जानेवारी) तीन दिवस दिल्लीत असणार आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीस जातायत. पण  वाल्मिक कराडवरून महाराष्ट्रातला राजकीय तणाव पाहता या दौऱ्यांचा राजकीय अर्थ काढला जात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी अजित पवारांची भेट घेऊन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांची भेट घेतली. त्यामुळे आता दिल्लीत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर काही निर्णय होणार का, याची चर्चा सुरू आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola