Dhananjay Deshmukh : बापाची हत्या..न्याय मागण्यासाठी लेक शिवरायांकडे;रायगडावर घालणार गारहाणं
Dhananjay Deshmukh : बापाची हत्या..न्याय मागण्यासाठी लेक शिवरायांकडे;रायगडावर घालणार गारहाणं
आज रायगडावर (Raigad) मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek) सोहळा संपन्न होणार आहे. यानिमित्त राज्यभरातून शिवभक्त रायगडावर येण्यास सुरुवात झाली आहे. अशातच मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील किल्ले रायगडावर दाखल झालं आहे. संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि बंधू धनंजय देशमुख रायगडावर दाखल झाले आहेत. महाराष्ट्रात माझ्या वडिलांप्रमाणे अनेकांची हत्या झालेली आहे. आम्हाला न्यायाची अपेक्षा असल्याचे मत वैभवी देशमुखने व्यक्त केले आहे.
महाराष्ट्राने आम्हाला साथ दिली, आता फक्त न्यायाची अपेक्षा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जशी शिक्षा देण्याची प्रथा होती तीच प्रथा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी वापरली तर राज्यातील गुन्हे थांबतील असे मत वैभवी देशमुख हीने व्यक्त केले. गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी आज देशमुख कुटुंब छत्रपती शिवाजी महाराजांना साकडे घालणार आहे. महाराष्ट्राने आम्हाला साथ दिली, आता फक्त न्यायाची अपेक्षा असल्याचे वैभवी देशमुख म्हणाली.