Dhananjay Deshmukh : विष्णू चाटेचा मोबाईल शोधण्यासाठी सर्व आरोपींना पुन्हा एकदा रिमांडमध्ये घ्या

Dhananjay Deshmukh : विष्णू चाटेचा मोबाईल शोधण्यासाठी सर्व आरोपींना पुन्हा एकदा रिमांडमध्ये घ्या
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण अपडेट..  विष्णू चाटेचा मोबाईल शोधण्यासाठी सर्व आरोपींचे पुन्हा एकदा रिमांड घ्या  विष्णू चाटे याच्या मोबाईल मध्ये मोठे पुरावे, ते नष्ट करण्यासाठीच मोबाईल गायब करण्याचे षडयंत्र   केवळ गुन्हा दाखल करून भागणार नाही: पुरावे नष्ट झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासन घेणार का?  संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी   सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेचा मोबाईल सापडत नसल्याच्या प्रकरणात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. परंतु केवळ गुन्हा दाखल करून भागणार नाही. तर त्या मोबाईल मध्ये असलेले पुरावे नष्ट झाल्यास त्याची जबाबदारी पोलीस प्रशासन घेणार का? असा सवाल उपस्थित करत धनंजय देशमुख यांनी मोबाईलच्या शोधासाठी सर्व आरोपींचे पुन्हा एकदा रिमांड घ्या आणि मोबाईल शोधून काढा अशी मागणी पोलीस प्रशासनाकडे केलीय..   संतोष देशमुख यांची हत्या होऊन 58 दिवस झाले तरी अद्याप पोलीस यंत्रणेला सीआयडीला सापडलेला नाही. यामुळे या मोबाईल मध्ये नेमके काय होते? असा प्रश्न कायम असून त्याचा शोध घेण्यासाठी पुन्हा एकदा या सर्व आरोपींची रिमांड घ्यावे अशीच मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे आज देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यातच असून ते या प्रकरणावर काही भाष्य करतात का? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola