Dhananjay Deshmukh on Santosh Deshmukh|आरोपींना फाशी नाही जन्मठेप द्या, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया

Continues below advertisement

Dhananjay Deshmukh on Santosh Deshmukh|आरोपींना फाशी नाही जन्मठेप द्या, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया

मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू बनलेल्या बीड जिल्ह्यातील केजमध्ये झालेल्या हत्येच्या घटनेनं राज्यभर खळबळ उडाली आहे. केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. मसाजोग ग्रामस्थांसह देशमुख कुटुंबीयांकडून तब्बल 12 तास अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागले. त्यामुळे, बीड (Beed) जिल्ह्यात कायद व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केल्याचंही सांगण्यात आला. आता, याप्रकरणी बीडचे माजी पालकमंत्री आणि आमदार धनंजय मुंडेंनीही (Dhananjay Munde) आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram