Devgad Mango : देवगड हापूसची पहिली पेटी बाजारात दाखल, पाच डझनाच्या पेटीला तब्बल 18 हजार रुपयांचा भाव
Continues below advertisement
देवगड हापूसची या हंगामातील पहिली पेटी सिंधुदुर्गातून रवाना झालीय. मालवणच्या कुंभारमाठ गावातील बागायतदार उत्तम फोंडेकर यांना पहिली पाठवण्याचा मान मिळालाय. त्यांनी पुण्याला दोन पेट्या पाठवल्या. त्यात पाच डझनाच्या पेटीला 18 हजार रुपयांचा भाव मिळालाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 20-25 दिवस आधीच हापूसची पहिली पेटी बाजारात आलीय. आंब्याचा हंगाम सुरू होण्यास अजून तीन ते चार महिन्यांचा कालावधी आहे. पण मुसळधार पावसात मोहोर आणि फळांचं उत्तम व्यवस्थापन करून त्यांनी प्रत्येकी पाच डझनाच्या दोन पेट्या पुण्याला पाठवल्या आहेत.
Continues below advertisement
Tags :
Pune Mango Devgad Mango Hapus Mango Alphanso Mango Kokan Mango Sindhudurg Mango Mango 2021 Pune Mango