Devendra Fadnavis On Nawab Malik : मलिकांना महायुतीत घेणं योग्य ठरणार नाही- फडणवीस
Continues below advertisement
Devendra Fadnavis On Nawab Malik : मलिकांना महायुतीत घेणं योग्य ठरणार नाही- फडणवीस
मनीलॉण्ड्रिंग प्रकरणात जामिनावर सुटलेले आमदार नवाब मलिक हे अजित पवार गटात सहभागी होऊन विधीमंडळात सत्ताधारी बाकावर बसले. आणि मलिक सत्ताधारी बाकावर बसल्यानं भाजपवर टीका होऊ लागली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहून मलिकांना महायुतीत सामावून घेण्यास विरोध
केला. सत्ता येते आणि जाते, पण देश महत्वाचा. त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती. त्यामुळं त्यांना महायुतीमध्ये सामावून घेता कामा नये असं फडणवीसांनी म्हटले. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांमधील मतभेद समोर येऊ लागल्यानं या प्रकरणावर चर्चा होऊ लागली आहे
Continues below advertisement