OBC आरक्षणावरून आज विधानसभेत जोरदार खडाजंगी, राज्य सरकार वेळकाढूपणा करतंय फडणवीसांचा आरोप
ओबीसी आरक्षणावरून आज विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. राज्य सरकार वेळकाढूपणा करतंय असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजपनं ओबीसी आरक्षणावर आक्रमक भूमिका घेतली. फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. या मुद्यावर राजकारण करू नका. गेल्या सात वर्षांत मोदी सरकार आणि फडणवीस सरकारनं काही केलं नाही, असा उलट आरोप छगन भुजबळ यांनी केला.