Nashik Rain : अवकाळी पावसाचा टॉमेटो पिकाला फटका ABP Majha

Continues below advertisement

आधीच महागाईच्या झळा सहन करणाऱ्यांना सामान्यजणांचा खिसा आणखी रिकामा होण्याची शक्यता आहे. टोमॅटोचे सध्याचे दर हे ८० रुपये किलोपर्यंत पोहचू लागले आहेत. अशातच येत्या काही दिवसात टोमॅटोच्या दरात अजून वाढ होऊन ते गगनाला भिडण्याची चिन्हं आहेत. राज्यात आलेल्या अवकाळी पावसाचा परिणाम सर्वांवर होणार आहे. 

 

बुधवारी सकाळपासून वादळी वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाचा मोठा फटका हा नाशिकमधील द्राक्ष, कांदा यासोबतच टोमॅटो पिकाला बसला आहे. टोमॅटोच्या बागेत पाणी साचले असून टोमॅटोला तडे गेले आहेत.  अनेक ठिकाणी तर टोमॅटो गळून पडला आहे.  या सर्व परिस्थितीमुळे टोमॅटो उत्पादक चिंतेत आहेत. तर, दुसरीकडे टोमॅटोच्या पिकाला चांगला दर मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान काही प्रमाणात भरून निघण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram