Devendra Fadnavis : यशवंत जाधव यांना भ्रष्टाचाराचे फक्त 10% मिळाले, 90% कुठे गेले? फडणवीसांचा सवाल
Continues below advertisement
राज्य सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे. हा आक्रोश बाहेर काढण्यासाठी जनआक्रोश मोर्चाची सुरुवात भाजपच्या वतीनं गडचिरोली येथून करण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. फडणवीस म्हणाले, कोरोनाकाळात आदिवासींना मदत करा, असा आक्रोश आम्ही करत होतो. पण, राज्य सरकारनं दारु दुकानदारांना मदत केली. त्यांची लायसन्सची फीस पन्नास टक्के केली. गडचिरोली, चंद्रपूर, नंदुरबारच्या शेतकऱ्यांचं पन्नास टक्के वीज बील माफ केलं नाही. हे राज्य सरकार आपला आवाज दाबू शकतो नाही, या सरकारमध्ये आवाज दाबण्याची हिम्मत नाही, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला. तर ओबीसी आरक्षण आणि मुंबई पालिकेच्या मुद्द्यांवरुनही निशाणा साधला,
Continues below advertisement