
Devendra Fadnavis Rapid Fire : लाडकं कोण? राज की उद्धव ठाकरे? देवेंद्र फडणवीसांचं उत्तर ऐकाच
देवेंद्र फडणवीसांनी रॅपिड फायर प्रश्न विचारण्यात आले, यावरे त्यांनी कोणते उत्तर दिले पाहा-
1. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत पुन्हा युती होऊ शकते का?
देवेंद्र फडणवीस- नाही
2. लाडके उपमुख्यमंत्री कोण, अजितदादा की एकनाथ शिंदे?
देवेंद्र फडणवीस- दोघेही माझे लाडके आहेत आणि मी पण त्यांचा लाडका आहे. त्यामुळे आम्ही लाडके उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आहोत.
3. लाडके ठाकरे कोण?, उद्धव ठाकरे की राज ठाकरे?
देवेंद्र फडणवीस- ठाकरे अशे आहेत की त्यांना आपण लाडकं म्हणायचं आणि त्यांनी आपल्याला दोडकं म्हणायचं, त्यामुळे यामध्ये आपण काय पडायचं, पण एक खरं सांगतो, गेल्या 5 वर्षांमध्ये माझा उद्धव ठाकरेंसोबत काहीच संबंध राहिलेला नाही, माझा राज ठाकरेंसोबतच संबंध राहिलाय. उद्धव ठाकरेंनी संबंध तोडून टाकले, म्हणजे मारामारी नाहीय, समोर आलो की आम्ही चांगले बोलतो, नमस्कार करतो, पण उद्धव ठाकरेंसोबत संबंध नाही.
4. लाडका मंत्री कोण, गिरीश महाजन की नितेश राणे?
देवेंद्र फडणवीस- लाडके मंत्री योजना सुरु केलेली आहे. त्याचे निकष ठरलेले आहेत. त्याप्रमाणे अर्ज घेतलेले आहेत. त्याचं प्रोसेसिंग सुरु आहे. ती प्रोसेस पूर्ण झाल्यावर सांगतो.
5. सर्वात जास्त नाराजीनाट्य कोण करतं?, अजितदादा की एकनाथ शिंदे?
देवेंद्र फडणवीस- नाराजीनाट्य वैगरे कोणीच करत नाही. अलीकडच्या काळामुळे, सोशल मीडियामुळे कोणत्याही गोष्टीला कसेही सांगितले जाते. माझा अनुभव असा आहे की, अजितदादा असो की एकनाथ शिंदे, दोघांचीही नाराजीनाट्य नाही. काही प्रश्न असतात, ते आम्ही एकत्र येऊन सोडवतो. एकनाथ शिंदे शिवसैनिक आहेत आणि शिवसैनिक हा भावनिक असतो. त्यामुळे एकनाथ शिंदे भावनिक आहेत. तर अजितदादा कामाच्या बाबतीत प्रॅक्टिकल आहेत.