
Devendra Fadnavis यांचा आणखीनं एक पेन ड्राइव्ह बॉम्ब, मध्यस्थी करणारा मुंबईतला 'तो' नेता कोण?
Continues below advertisement
राज्याच्या राजकारणात सध्या पेन ड्राईव्ह बॉम्बची चर्चा आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आरोपांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकला... आणि मुंबई पोलीस दलातील निवृत्त अधिकारी इसाक बागवान यांच्यावर निशाणा साधला... इसाक बागवान यांच्या भावाचं स्टिंग ऑपरेशन असल्याचा दावा करत हा पेन ड्राईव्ह त्यांनी गृहमंत्र्यांकडे सादर केला... यात मुंबईतला एक नेता इसाक बागवान यांना बक्षीसपत्र म्हणून जमीन मिळवून देण्यासाठी मध्यस्थी करत असल्याचाही दावा करण्यात आलाय... त्यामुळे बागवान यांच्या संपत्तीची चर्चा सुरु झालीच, पण फडणवीस यांनी उल्लेख केलेला दाऊद इब्राहिमशी कनेक्शन असलेला तो नेता कोण याबाबतही उत्सुकता निर्माण झाली....
Continues below advertisement