Devendra Fadanvis:ठाकरेंचा शिवसेना हा पक्ष मी नाही तर पहिल्यांदा पवारांनी फोडला-फडणवीस
Continues below advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक राजकीय दावे केले. ठाकरेंचा शिवसेना पक्ष मी नाही, तर पहिल्यांदा पवारांनी फोडला, असे फडणवीस म्हणाले. पवारांच्या सोबत ठाकरे एकत्र आले आणि त्यानंतर मुख्यमंत्री बनले, अशी टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरेंचा त्यांच्या आमदारांसोबत संपर्क तुटला होता, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरूनही फडणवीसांनी भाष्य केले. राजकीय मजबूरी म्हणून दोघे एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले. ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचाच विजय होणार, असेही फडणवीस म्हणाले. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या निरोपाच्या भाषणाच्या वेळेला उद्धव ठाकरे यांना सोबत येण्याची ऑफर दिली होती, मात्र ही ऑफर मस्करी असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची एकत्र येण्याची शक्यता फार कमी आहे, असेही फडणवीस म्हणाले. "कोणत्याही लग्नात गेलं की तेच नवरदेव, असं ठाकरेंना वाटतं," असेही फडणवीस म्हणाले. संख्याबळ नसतानाही विरोधी पक्ष नेतेपद द्या, अशी उद्धव ठाकरेंची मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. ईडी, सीबीआय आणि पोलिस बाजूला केले तर सगळे परत येतील, असे दानवे म्हणाले. लोक मानसिक दबावाखाली काम करत असल्याचा दावा दानवे यांनी केला.
Continues below advertisement