Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही

Continues below advertisement

Devendra Fadnavis on Satara drugs case: साताऱ्यातील महाबळेश्वर परिसरात असणाऱ्या सावरी गावात काही दिवसांपूर्वी 145 कोटींचा ड्रग्जचा साठा सापडला होता. ड्रग्ज सापडलेली जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या मालकीची असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला होता. त्यामुळे राज्यभरात खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकनाथ शिंदे यांची पाठराखण केली. याप्रकरणात विरोधक एकनाथ शिंदे यांचे नाव जाणीवपूर्वक गोवत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. (Satara Drugs Case)

साताऱ्यात पोलिसांनी धाड टाकून ड्रग्जचा इतका मोठा साठा जप्त केला, त्यासाठी मी सर्वप्रथम पोलीस दलाचे अभिनंदन करतो. जो धंदा चालला होता, त्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला. या प्रकरणात जाणीवपूर्वक एकनाथ शिंदेंचं नाव आणण्याचा प्रयत्न चुकीचा आहे, अयोग्य आहे, निषेर्धाह आहे. आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यात एकनाथ शिंदे यांच्या परिवाराचा संबंध दुरावन्याने आढळून आलेला नाही. आम्ही याप्रकरणाची पूर्ण चौकशी करत आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola