Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

Continues below advertisement

Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर करण्यात आला. नाशिकच्या सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उच्च रक्तदाबाचा त्रास वाढल्याने सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल असलेल्या कोकाटे यांच्यावर थोड्याच वेळात अँजिओग्राफी केली जाणार आहे.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोकाटे यांना नुकतेच अँजिओग्राफीसाठी नेण्यात आले असून, रुग्णालयात सध्या त्यांच्या मुलगी सीमंतिनी कोकाटे आणि पत्नी सीमा कोकाटे उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीकडे राजकीय वर्तुळासह पोलिस प्रशासनाचेही बारकाईने लक्ष लागले आहे.

Manikrao Kokate Health Update: उच्च रक्तदाब अनियंत्रित, ICU मध्ये उपचार सुरू
नाशिक सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर माणिकराव कोकाटे यांचा रक्तदाब अचानक वाढला, त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू असून, उच्च रक्तदाब नियंत्रणात येत नसल्याने पुढील काही दिवस वैद्यकीय देखरेखीखाली ठेवणे आवश्यक आहे, अशी माहिती डॉक्टरांनी नाशिक पोलिसांना दिल्याचे समजते. डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानुसार, कोकाटे यांना सध्या पूर्ण विश्रांतीची आवश्यकता असून, कोणताही ताण येऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola