Devendra Fadnavis : Pankaja Munde यांच्याशी बहिणीप्रमाणे असलेलं नातं आजही कायम आहे : देवेंद्र फडणवीस
गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.. पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांची नाराजी दूर करताना केलेलं भाषण आणि भाजपच्या ओबीसी परिषदेला पंकजा मुंडेंच्या गैरहजेरीनं हा दुरावा अधोरेखित केला. मात्र पंकजा मुंडे आणि माझं नातं राजकारणापलिकडचं आहे अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.. पूर्वीप्रमाणेचं बहीण-भावंडांप्रमाणे नातं आजही कायम आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.. कोल्हापूर आणि सांगलीचा नुकसान पाहणी दौऱा करण्यापूर्वी फडणवीसांनी एबीपी माझाला विशेष मुलाखत दिली...