Devendra Fadnavis on Chhagan Bhujbal : 'दादांचा भुजबळांना राष्ट्रीय पातळीवर पाठवण्याचा विचार'

Continues below advertisement

'दादांचा भुजबळांना राष्ट्रीय पातळीवर पाठवण्याचा विचार'

हे मला भेटले. आमच्या तिन्ही पक्षांची त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना आहे. 
अजितदादांनी भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही, तेव्हा त्यांना डावलण्याची त्यांचा हेतू नव्हता. त्यांना राष्ट्रीय पातळीवर पाठवण्याचा हेतू होता.
त्यांनी अशी कोणती मागणी केली नाही. तिन्ही पक्ष एकत्रच आहोत. त्यांच्याबद्दल सगळ्यांना आदर आहे.  
बीडच्या प्रकऱणाची सर्व चौकशी सुरु आहे. सर्व चौकशी होईल. 
कुठल्याही प्रकारची निदर्शन करणं योग्य ठरणार आहे. 

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज असलेल्या छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.. सागर बंगल्यावर छगन भुजबळ आणि समीर भुजबळांनी मुख्यमंत्र्यांसोबत ४० मिनिटं चर्चा केली,

दरम्यान येत्या १० दिवसांमध्ये तोडगा काढणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचं भुजबळांनी सांगितलंय. दरम्यान साताऱ्यात ३ जानेवारीला मुख्यमंत्री फडणवीस आणि भुजबळांची बैठक होणार असल्याची माहिती आहे.

((दरम्यान राज्यातील इतरही महत्त्वाच्या विषयांवर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याचं भुजबळांनी सांगितलंय.))

महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांना भेटण्याआधी भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली.. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram