Devendra Fadnavis on Baba Siddque | बाबा सिद्दीकींचा गोळीबारात मृत्यू, फडणवीस थेट लीलावती रुग्णालयात

Devendra Fadnavis on Baba Siddque | बाबा सिद्दीकींचा गोळीबारात मृत्यू, फडणवीस थेट लीलावती रुग्णालयात

ष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांचा मृत्यू झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी खेरवाडी सिग्नलजवळील आमदार झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाकडे जात असताना त्यांच्यावर तीन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला ज्यात त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. यातील एक आरोपी हरियाणा तर दुसरा उत्तर प्रदेश इथला असल्याची माहिती आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस लिलावती रुग्णालयात पोहोचले. तसंच मुंबई क्राईम ब्रांचकडे तपास सोपवण्यात आला आहे.

बाबा सिद्दिकी हे गेली तीन ते चार दशकं राजकारणात सक्रिय होते. राजकीय आयुष्यातील बहुतांश काळ ते काँग्रेस पक्षात होते. काही महिन्यांपूर्वीच ते अजित पवारांच्या गटात गेले होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola