Devendra Fadnavis on Baba Siddique : सिद्दीकी हत्येप्रकरणी दोन आरोपी अटकेत; तपास सुरू - फडणवीस

Devendra Fadnavis on Baba Siddique : सिद्दीकी हत्येप्रकरणी दोन आरोपी अटकेत; तपास सुरू - फडणवीस

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी  (Baba Siddique Shot Dead) यांची काल रात्री तीन जणांनी गोळ्या घालून हत्या केली. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणावरून विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. आता यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसलाय : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले की,  ही दुर्दैवी आणि अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे. बाबा सिद्दिकी यांच्याशी माझी स्वतःची निकटची मैत्री होती. अनेक वर्ष आम्ही सोबत काम केलं. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनेने आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे. आता या घटनेतील दोन आरोपी पकडलेले आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील काही धागेदोरे मिळत आहेत. काही अँगल्स लक्षात येत आहेत. मात्र, त्या संदर्भात आता लगेच बोलणं योग्य नाही. आज आरोपींची कस्टडी झाल्यानंतर पोलीस या संदर्भात माहिती देतील, असे त्यांनी म्हटले आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola