Devendra Fadnavis on Deshmukh | सलीम जावेदची स्क्रिप्ट, रजनिकांतची फिल्म, फडणवीसांचा देशमुखांवर नेम

Continues below advertisement

Devendra Fadnavis on Deshmukh | सलीम जावेदची स्क्रिप्ट, रजनिकांतची फिल्म, फडणवीसांचा देशमुखांवर नेम

हे देखील वाचा

मोठी बातमी : कॅश कांडप्रकरणाच्या राड्यात हितेंद्र ठाकूरांनाच सर्वात मोठा धक्का, थेट उमेदवारचाच भाजपमध्ये प्रवेश

Suresh Padvi join BJP : बहुजन विकास आघाडीला डहाणूमध्ये मोठा धक्का बसला आहे.  बहुजन विकास आघाडीचे (Bahujan Vikas Aghadi) डहाणू विधानसभेचे उमेदवार सुरेश पाडवी (Suresh Padvi) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुरेश पाडवी बहुजन विकास आघाडीचे पालघर उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांना डहाणू विधानसभेची (Dahanu Assembly) उमेदवारी देण्यात आली होती . मात्र, उद्या मतदान असतानाच त्यांनी आजच भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. 

सुरेश पाडवी यांचा भाजपाचे डहाणू विधानसभेचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा

दरम्यान, सुरेश पाडवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच भाजपाचे डहाणू विधानसभेचे उमेदवार विनोद मेढा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे सगळी राजकीय समीकरणं बदललली आहेत. सुरेश पाडवी यांनी भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्याशी चर्चा करून अधिकृतरित्या पक्षप्रवेश केला आहे.

विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडेंवर पैसे वाटप केल्याचा आरोप

एका बाजुला पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये भाजप नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याच्या आरोपाचं प्रकरण सुरु होते. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही आरोप केला होता. विनोद तावडे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलला शेकडो कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता. त्यामुळे बराच काळ गदारोळ झाला. त्यानंतर पोलिसांनी विनोद तावडे यांना सुरक्षित बाहेर काढले आहे. हॉटेलमध्ये 9 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. हा सर्व प्रकार सुरु असतानाच दुसरीकडे डहाणू विधानसभा मतदारसंघात भाजपनं मोठा डाव साधला आहे. डहाणू विधानसभेचे उमेदवार सुरेश पाडवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का मानला जातोय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram