ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 05 December 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 05 December 2024

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार...फडणवीसांचं पत्र उदय सामंतांनी राजभवनावर पोहोचवलं...आमदारांची विनंती शिंदेंनी मान्य केल्याची सामंतांची माहिती...

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री व्हायला तयार नव्हते, संघटक म्हणून काम करण्याचा होता इरादा...उदय सामंतांची माहिती...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सह्याद्री अतिथीगृहावर दाखल...शपथविधीआधी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांशी चर्चा करण्याची शक्यता...

शपथविधीसाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गुलाबी रंगात निघाले न्हाऊन...महिलांच्या गुलाबी रंगाच्या साड्या आणि फेेटे...तर पुरुषांनी घातले गुलाबी रंगाचे टी शर्ट...

शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी...फडणवीस, शिंदे आणि अजितदादांच्या कुटुंबीयांसाठी खास आसनव्यवस्था...

शपथविधीसाठी भाजपचे दिग्गज नेते आणि वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री दाखल...नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ, प्रमोद सावंत, पुष्करसिंह धामी, पेमा खंडू पोहोचले..

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram