Devendra Fadnavis Meets Raj Thackeray :उद्या निकाल, फडणवीस देवेंद्र राज ठाकरेंच्या भेटीला, कारण काय?

Continues below advertisement

Devendra Fadnavis Meets Raj Thackeray :उद्या निकाल, फडणवीस देवेंद्र राज ठाकरेंच्या भेटीला, कारण काय?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघे काही तास बाकी असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर असताना आताच्या घडीची ही मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचले आहेत. ही भेट पूर्व नियोजित होती का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, राज्यातील दोन दिग्गज नेत्यांची निकालापूर्वी भेट होत असल्याने त्यांच्यात नेमकी काय खलबतं होतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचं गणित पाहता ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभा निवडणुकीत मनसे महायुती असेल, असं   वारंवार बोललं जात आहे. लोकसभेत मनसेला काही जागा मिळण्याची शक्यता होती. मात्र, नंतर या जागा शिंदे गटाला देण्यात आल्या. आता महायुतीचं गणित लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अबलंबून आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram