Chandrakant Patil : Devendra Fadnavis दबंग नेते,शंभर Ajit Pawar खिशात घालून फिरतात : चंद्रकांत पाटील

Continues below advertisement

Chandrakant Patil on Hasan Mushrif : कायद्याची लढाई कायद्यानंच लढा, असं म्हणत येत्या दोन दिवसांत काँग्रेसच्याही काही नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले जातील, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जे आरोप केले त्यावर मुश्रीफांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आणि त्यानंतर मुश्रीफांनी चंद्रकांत पाटलांवर जे आरोप केले पाटलांनीही या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच यावेळी बोलताना हसन मुश्रीफांना माझं नाव घेतल्याशिवाय झोपही लागत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. 

चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले की, "कायद्याची लढाई कायद्यानं लढा, कायद्याची लढाई कोल्हापुरी चपलेनं लढू नका. कोल्हापुरी चप्पल दाखवणं सोप्पं आहे, पण ईडीला फेस करणं कठीण आहे. तोंडाला फेस येईल. यावर बोलात की, कारखान्यात 98 कोटी ज्या कंपन्यांमधून आलेत, त्या कंपन्या कुठे आहेत? त्या कंपन्यांनी सेनापती घोरपडेंच्या कारखान्यामध्ये कशी गुंतवणूक केली, यावर बोला ना, यावर बोलतच नाही. यावेळी मला मुश्रीफांना एक आवाहन करायचं आहे की, पॅनिक होऊन काही होत नसतं, शांत डोक्यानं काम करायचं असतं." 

"पश्चिम महाराष्ट्रातून, कोल्हापुरातून आम्ही भुईसपाट झालो, असा आरोप तुम्ही करताय. पश्चिम महाराष्ट्रात फक्त कोल्हापूर येत नाही. सोलापुरात भाजपचे फक्त दोन आमदार होते. ते आता 8 झालेत, मुश्रीफ साहेब. सांगली महापालिकेत महापौरपद दगाफटक्याने गेलं पण स्थायी समिती पुन्हा भाजपाकडे आली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हापरिषद आमच्याकडे होती. पण हे तीन पक्ष 56ला मुख्यमंत्री 54ला उपमुख्यमंत्री आणि 44ला महसूलमंत्री यातून कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद गेली.", असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, "मी परवाच्या पत्रकार परिषदेत म्हटलंय की, हसन मुश्रीफांना माझं नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही. ते कसेही असले तरी माझे मित्र आहेत. त्यांच्या झोपेला एक गोळी न घेता माझं नाव पुरणार असेल तर त्यांच्या गोळीचे पैसे वाचवणं ही मित्र या नात्यानं माझी जबाबदारी आहे. माझं नाव घेण्यासाठी आणि माझ्या विरोधा अब्रूनुकसानाचा दावा करण्यासाठी त्यांना पूर्ण परवानगी आहे." 

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram