महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून चोरटा फरार, पाठलाग करताना महिला फरफटत रस्त्यावर पडली

धोबीघाट परिसरात जोधपूर मिठाईवाला हे दुकान आहे. या दुकानातून मोर्या टीचर नामक महिला आज सकाळी काही सामान घेऊन बाहेर पडली. यावेळी एक चोरटा दुचाकीवरून तिथे आला आणि दुचाकी सुरू ठेवून तो चालत मोर्या टीचर यांच्याजवळ आला. त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा त्याने केला आणि निघताना त्यांच्या गळ्यातली सोनसाखळी ओढत तो गाडीकडे पळाला. मात्र मोर्या टीचर यांनी त्याच्या मागे पळत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्याने त्यांना फरपटत नेलं, मात्र अखेर चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात वारंवार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असून पोलीस या चोरट्यांना पकडण्यात अपयशी ठरतायत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola