
Devendra Fadnavis Majha Vision Full : बेधडक उत्तरं, तुफान फटकबाजी! दवेंद्र फडणवीस भरभरुन बोलले..
Devendra Fadnavis Majha Maharashtra Majha Vision: मी कोणत्याही रोलमध्ये गेलो की लगेच जॅकेट बदलतो. मी आमदाराचा मुख्यमंत्री झालो, त्यावेळी लगेच मुख्यमंत्र्यांच्या रोलमध्ये गेलो. मी मुख्यमंत्रीनंतर ज्यावेळी विरोधीपक्षनेता झालो, त्यावेळी सरकारला झोपू दिलं नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षनेत्याचा मी उपमुख्यमंत्री झालो, त्यावेळी विचार केला नाही, की मी मुख्यमंत्री होतो. मी लगेच उपमुख्यमंत्र्यांच्या रोलमध्ये गेलो. त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या रोलमध्ये येणं सोपं होतं. त्यामुळे ज्यावेळी मुख्यमंत्रिपद स्वीकारलं, त्यावेळी लगेच कामाला लागलो. त्यामुळे हे बदल माझ्यासाठी नवीनही नाही आणि फार कठीणही नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन या कार्यक्रमात एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
गेल्या अडीच वर्षांच आमचं महायुतीचं सरकार चांगलं काम करत होतं. खरंतर आमचं सरकार अडीच वर्षे वॉर झोनमध्ये काम करत होतं. लोकसभा, विधानसभा अशा निवडणुक, असा मोठा वॉर झोन होता. वॉर झोनमध्ये काम करताना त्यावेळेस आपले गोल शॉर्ट असतात. ज्यावेळी शांततेचा काळ असतो, त्यावेळी त्यानंतर आता लॉन्ग टर्मचे गोल ठेवावे लागतात. आता 100 दिवसांचा अजेंडा ठरवण्यात आलाय. प्रत्येक विभागाला 100 दिवसांचे टार्गेट दिलंय. आम्ही 15 एप्रिल पर्यंत वेळ दिला आहे..त्यांना त्यांचा तो प्लॅन पूर्ण करायचा आहे. तहसील स्तरावर 10 हजार ऑफिसेसला सात कलमी कार्यक्रम दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. परवा मी आणि एकनाथ शिंदे आम्ही एमएसआरडीसीची बैठक घेतली शक्तीपीठ, रिंगरोड , नदी जोड प्रकल्प, विमानतळं अशा प्रकल्पांचे फायनाशीअल प्लॅनिंग केलं. पुणे विमानतळाचे नोटीफीकेशन आपण काढलं.शेतीच्या क्षेत्रात एआयचा उपयोग जास्तीत जास्त करायचा आहे.. त्यासा