Devendra Fadnavis Dharmaveer 2 : तरडेसाहेब 3-4 ची तयारी करा,दिघेंचा शिष्य काय 10-15 वर्ष थांबत नाही
Devendra Fadnavis Dharmaveer 2 : तरडेसाहेब 3-4 ची तयारी करा,दिघेंचा शिष्य काय 10-15 वर्ष थांबत नाही Dharmaveer 2 : येत्या 9 ऑगस्ट रोजी धर्मवीर- 2 (Dharmaveer) सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. मागील अनेक दिवसांपासून या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमात प्रसाद ओक आणि क्षितिज दाते हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रसाद ओकने (Prasad Oak) आनंद दिघे यांची तर क्षितिज दातेने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भूमिका साकारली आहे. धर्मवीर- 2 सिनेमांत अनेक गोष्टींचा उलगडा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आनंद दिघेंच्या मृत्यूचं गुढ, एकनाथ शिंदेंच्या बंडाची गोष्ट अशा अनेक प्रश्नांची उत्तर या ट्रेलरमधून मिळणार का? याची देखील उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय मंडळी उपस्थित होती. 'धर्मवीर -2' (Dharmaveer 2) या सिनेमाचा नुकताच हिंदी आणि मराठी ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हिंदी ट्रेलर लॉन्च करण्यासाठी बॉलीवूडचा भाईजान सलमान खानने (Salman Khan) विशेष उपस्थिती लावली. सलमानच्या उपस्थितीत या सिनेमाचा हिंदी ट्रेलर लॉन्च करण्यात आला. येत्या 9 ऑगस्ट रोजी हा सिनेमाचा संपूर्ण देशभरात रिलीज केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अशोक सराफ, सलमान खान ही मंडळी व्यासपीठावर उपस्थिती होती. दरम्यान पहिल्या सिनेमाच्या उदंड प्रतिसादानंतर हा सिनेमा हिंदीतही प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. त्यामुळे धर्मवीर-2 सिनेमा हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. ट्रेलरमध्ये काय? दरम्यान या ट्रेलरमध्ये काही संवादांनी विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाचं कारण, आनंद दिघे यांचा मृत्यू कसा झाला असे अनेक प्रश्न उपस्थित करणारे संवाद यामध्ये आहेत. आनंद दिघे हे म्हणतात की,कुणाशीतरी आघाडी करुन तुम्ही विकलात तो भगवा रंग. हा संवाद सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेत आहे. तसेच एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारणाऱ्या क्षितिज दातेच्याही एका संवादाने लक्ष वेधून घेतलं आहे, 20 वर्षांपूर्वी याच ठाण्यात एक दाढीवाला बेसावध होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करुन गेला आहे.