Devendra Fadnavis EXCLUSIVE : पंकजा मुंडेंसोबत पूर्वीसारखंच बहिणीचं नातं, देवेंद्र फडणवीस

Continues below advertisement

Devendra Fadnavis Exclusive : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला सोबत घेण्यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत बोलताना त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांना मनसेला सोबत घेणार का असा प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले की, राज ठाकरेंशी चांगले संबंध आहेत.  त्यांच्या पूर्वी भेटी झाल्या आहेत.  ज्यांची आमची भूमिका पटेल त्यांच्या सोबत जाण्यासाठी हरकत नाही.  आम्ही अनेक पक्ष सोबत घेतले आहेत जर ती वेळ आली तर त्यांचा विचार करू, असं फडणवीस म्हणाले. 

अजित पवारांवर केली मिश्किल शैलीत चिमटा 

जुलैमध्ये वाढदिवस असणारे मुख्यमंत्री होतात का? असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी मिश्किल शैलीत अजित पवारांना चिमटा काढला. ते म्हणाले की, तुम्ही याविषयी अजित पवारांना विचारलंत तर त्यांना जास्त आनंद होईल. कारण त्यांचाही जुलैचा वाढदिवस आहे. पण त्यांची संधी बऱ्याचदा हुकलीये पण आता त्याबद्दल काय सांगायचं, असं ते म्हणाले.  अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे का असं विचारलं असता राज्यासमोर अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदापेक्षाही महत्त्वाचे प्रश्न सध्या आहेत, असं म्हणत त्यांनी उत्तर देणं टाळलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram