सरकारने थोडा विचार केला तर पायी वारी शक्य होती, देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका

पंढरपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून यंदाच्या पायी आषाढी वारीला बायो बबल नियमांनुसार, परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे. एकीकडे वारकरी संप्रदाय पायी वारी आणण्यावर ठाम आहे. तर दुसरीकडे आळंदी किंवा पालखी मार्गातील इतर काही गावातील ग्रामस्थांनी पायी वारी नको, असा आग्रह धरला आहे. दरम्यानच्या काळात वारकरी संप्रदायानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पायी वारीसाठी बायोबबल नियमांनुसार, परवानगी द्या, अशी मागणी करणारं पत्र लिहिलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola