Devendra Fadnavis : Nishikant Dube मुंबईत आल्यास गैरवर्तन होणार नाही याची काळजी घेऊ - फडणवीस

निशिकांत दुबे यांच्या 'पटक पटक के मारेंगे' या आक्षेपार्ह वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दुबे यांचे वक्तव्य चुकीचे होते आणि त्याचे समर्थन होणार नाही, असे फडणवीस म्हणाले. मुंबईत आल्यास दुबे यांच्यासोबत गैरवर्तन होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'ज्याला मराठी येत नाही त्यांना मारणं योग्य नाही' असे म्हटले. महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी आले पाहिजे हा आग्रह योग्यच आहे, असेही त्यांनी नमूद केले. निशिकांत दुबे यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले. राज ठाकरे आणि निशिकांत दुबे यांच्याशी आमचा संबंध नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. निशिकांत दुबे यांच्यासोबत मुंबईत गैरवर्तन होणार नाही याची काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola