Devendra Fadnavis यांना आलेल्या नोटीशाविरोधात भाजप आक्रमक,उद्या राज्यभर भाजप नोटीशीची होळी करणार
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना वांद्रे कुर्ला संकुलातील सायबर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्याबाबतची नोटीस बजावण्यात आली होती... त्यानंतर आता स्वतः पोलीसच उद्या सकाळी अकरा वाजता फडणवीसांच्या घरी जाऊन चौकशी करणार आहेत.... बदली घोटाळा प्रकरणाचा अहवाल लीकप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली होती... त्यानंतर भाजपने आक्रमक होत... उद्या रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिलाय... हजारो समर्थक उद्या बीकेसी पोलीस स्टेशनसमोर जमणार आहेत... त्यामुळे उद्या मुंबईत भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जाणार होता... पण आता पोलीसच फडणवीसांच्या घरी जाऊन चौकशी करणार असल्यानं उद्या नेमकं काय होणार?, हे आता पाहावं लागणारेय...