Shinde - Fadnavis Welcome : विजयानंतर फडणवीस सभागृहात, भाषण थांबवत शिंदेंकडून अभिनंदन
Shinde - Fadnavis Welcome : विजयानंतर फडणवीस सभागृहात, भाषण थांबवत शिंदेंकडून अभिनंदन
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election Result) गणितात देवेंद्र फडणवीसांची (Devendra Fadnavis) जादू कायम असल्याचं पाहायला मिळालं. फडणवीसांचा मॅजिक पॅटर्न सलग तिसऱ्यांदा कायम असल्याचा दिसला. कारण महायुतीचे सर्व 9 उमेदवार विधानपरिषद निवडणुकीत विजयी झाले आहेत. महायुतीचे उमेदवार योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, अमित गोरखे यांचा विजय झाला. अजितदादांचे उमेदवार शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर विजयी झाले. तिकडे शिवसेनेच्या भावना गवळी आणि कृपाल तुमानेंनाही गुलाल लागला. यापूर्वी देवेंद्र फडणवीसांना महाविकास आघाडीला दोनवेळा धक्का दिला होता. 10 जून 2022 रोजी राज्यसभा तर 20 जून 2022 रोजी विधानपरिषदेच्या निवडणुकीत फडणवीसांनी आपल्या मॅजिक पॅटर्नन महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला होता. 2022 च्या निवडणुकीचे मुख्य सूत्रधार देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं. यामुळे यंदाही या मतदानाच्या मॅजिक पॅटर्नची संपूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच देण्यात आली होती.