Pankaja Munde vs BJP : देवेंद्र फडणवीस यांचं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या टीकेवर मौन
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा काल सावरगावमधल्या भगवान भक्तीगडावर आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केलं. आजचा सोहळा खूप देखणा आहे, देशात असा सोहळा कुठे होत नसेल, असं म्हणाल्या. पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने भगवानगडावर दाखल झाल्या होत्या. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, मी हेलिकॉप्टरमधून भगवान बाबांवर फुलं टाकत होते. तसेच, मी तुमच्या पायावरही फुलं टाकत होते. या मेळाव्यात भजपला घरचा आहेर देत सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावा, असा सल्ला पंकजा मुंडे यांनी दिला. परंतु यावर प्रतिक्रिया देणं मात्र देवेंद्र फडणवीस यांनी टाळलं आहे.