Navjyot Singh Siddhu पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहणार, प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे
Continues below advertisement
काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धूंनी पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतलाय. पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी सिद्धूंची भेट घेतली. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाल्यानंतर सिद्धूंनी काँग्रेसच्या पंजाब प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला. त्यामुळे आता सिद्धूच पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहणार आहेत. दरम्यान, 10 महिन्यांनी पंजाब विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यात पक्षांतर्गत वादाचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होऊ नये यासाठी काँग्रेसकडून आतापासूनच मोर्चेबांधणी केली जातेय.
Continues below advertisement