Devendra Fadnavis : हिरेनची हत्या होणार हे देशमुखांना माहित होतं की नाही? : देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis On Mansukh Hiren : हिरेनची हत्या होणार हे देशमुखांना माहित होतं की नाही? देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांना सवाल
एबीपी माझाच्या माझा व्हिजन कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुखांवर मोठा आरोप केलाय... मनसुख हिरेनची हत्या होणार हे देशमुखांना माहिती होतं की नाही याचं उत्तर त्यांनी द्यावं असा थेट सवाल फडणवीसांनी केला... हे उत्तर कधीतरी मिळेलच असंही फडणवीस म्हणाले. द डायरी ऑफ होम मिनिस्टर या पुस्तकातून अनिल देशमुखांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्या आरोपांविषयी माझा व्हिजन कार्यक्रमात फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी फडणवीसांनी देशमुखांना हा सवाल केलाय.