अनिल देशमुखांच्या ईडी चौकशीचा राजकीय अर्थ काढू नये,देवेंद्र फडणवीसांचा महाविकासआघाडी नेत्यांना सल्ला
नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले आहेत. सकाळपासून त्यांच्या घरात झाडाझडती सुरु आहे. दरम्यान कारवाई दरम्यान अनिल देशमुख सध्या नागपुरात नाहीत, शिवाय ते मुंबईतही नसल्याचं कळतं. अनिल देशमुख दिल्लीत असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान गृहमंत्री असताना देशमुख यांचं ज्ञानेश्वरी या शासकीय निवासस्थानाचीही झाडाझडही होण्याची शक्यता आहे.
Tags :
Devendra Fadnavis Anil Deshmukh CBI Parambir Singh CBI Raid ED Raid Anil Deshmukh Resign Anil Deshmukh Cbi Raid Cbi