Devendra Fadanvis Vidhan Sabha : असा बांबू लावला की जो पर्मनंट आहे,फडणवीसांच्या वक्तव्याने एकच हशा..

Continues below advertisement

Devendra Fadanvis Vidhan Sabha : असा बांबू लावला की जो पर्मनंट आहे,फडणवीसांच्या वक्तव्याने एकच हशा..

जनतेला आम्ही जी जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केलं. तसेच ज्या ज्या योजना आम्ही सुरु केल्या आहेत, त्यातील एकही योजना (Yojana) बंद होऊ देणार नसल्याचे आश्वासन देखील फडणवीसांनी दिले. ते विधानसभेत बोलत होते. लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं आहे. लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशन संपल्यानंतर त्यांच्या खात्यावर टाकणार असल्याचेही फडणवीसांनी सांगितले. लाडक्या बहिण योजनेच्या बाबतीत नवीन निकष नाहीतलाडक्या बहिण योजनेच्या बाबतीत नवीन निकष काही नाहीत. योजना चुकीच्या पद्धतीनं वापरत असेल तर ते तपासणं गरजेचं आहे. कारण हा जनतेचा पैसा असल्याचे फडणवीस म्हणाले. समाजात चांगल्या प्रवृत्तीसारख्याच वाईट प्रवृत्ती देखील असल्याचे फडणवीस म्हणाले. आम्ही शेतकरी असतील, युवा असतील, वंचितांच्या संदर्भातील योजना असतील, ज्येष्ठांच्या संदर्भातील सर्व आश्वासने पूर्ण करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.  

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram