Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं

Continues below advertisement

Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (गुरुवारी) विधानसभेतील आपलं पहिलं भाषण केलं. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी राज्यात आलेल्या उद्योगांवरती सखोल भाष्य केलं आहे. त्यांनी यावेळी सभागृहात बोलताना आत्तापर्यंत राज्यात आलेल्या प्रकल्पाबाबत विरोधकांना सर्व माहिती दिली आहे. सभागृहात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जसं ईव्हीएम आहे, तसंच काही मिळालं नाही की, मग महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला चालले म्हणायचं असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना डिवचलं आहे. 

काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस?

गुजरात राज्य जाहीराती कशाला देतं, आपले विरोधक रोज सांगतात गुजरात चांगलं आहे, हे रोज प्रचार आणि प्रसार करत आहेत, सर्व उद्योग तिकडेच चाललेत म्हणून, काही काळजी करू नका, महाराष्ट्र कालही एक नंबर होता, आजही एक नंबर आहे आणि उद्याही एक नंबर राहिलं. महाराष्ट्राशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. महाराष्ट्राची आपली एक ताकद आहे आणि एक लक्षात ठेवा देशामध्ये आज दहा राज्य स्पर्धा करत आहेत. तो जमाना गेला, जेव्हा दोन ते तीन राज्य स्पर्धा करत होती. आज दहा राज्यात स्पर्धा करत आहेत. आपण त्याकरता देखील आनंदित राहिलं पाहिजे, देशाचा विकास करायचा असेल तर सर्व राज्यानी पुढे गेलं पाहिजे. केवळ महाराष्ट्राने देशाचा विकास होत नाही. सर्व राज्यांनी विकास केला पाहिजे, तर त्याचवेळी सर्व राज्यांना मागे टाकून महाराष्ट्र कसा पुढे राहील हा प्रयत्न आम्हाला करायचा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram